Ezekiel 40:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने मला बाहेरील अंगणात नेले तेव्हा तेथे सभोवार खोल्या असून त्या अंगणात चिरेबंदी केली होती असे दृष्टीस पडले; ह्या चिरेबंदीवर तीस खोल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले. तिथे अंगणाच्या सभोवती काही खोल्या व बांधलेली पाऊलवाट मी पाहिली; पाऊलवाटेच्या बाजूने तीस खोल्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरच्या अंगणात आणले. पाहा, तेथे अंगणाच्या सर्व बाजूंना खोल्या असून पदपथ केला होता. पदपथावर तीस खोल्या होत्या.