Ezekiel 40:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दक्षिणेकडच्या दाराजवळच्या खोल्या, बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. दार 50 हात (87 फूट 6 इंच) लांब व 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद होते. त्यांच्या सर्व बाजूंनी द्वारमंडप होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यांच्यावरील महिरपी ही मापली, ती तेवढीच भरली; त्याला व त्याभोवतालच्या महिरपींना झरोके होते; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यावरल्या कमानी ही मापली, ती तेवढीच भरली; त्यास व सभोवतालच्या कमानींना अरुंद खिडक्या होत्या; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात भरली.