Ezekiel 40:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87 फूट 6 इंच) लांब व 25 हात (43 फूट 9 इंच) रुंद होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या चौक्या, खांब व महिरपी त्याने मापल्या, त्याही तेवढ्याच भरल्या; त्याला सभोवार झरोके व महिरपी होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या चौक्या, त्याच्या भिंती आणि त्याच्या देवड्यांचे माप हे सुद्धा तितकेच होते. वेशी व त्याच्या देवड्यांना चहूकडून झरोके होते. त्याची लांबी पन्नास हात आणि रुंदी पंचवीस हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या चौक्या, खांब, व कमानी या मापाप्रमाणे त्याने मापल्या; आणि त्यास व कमानीसभोवार खिडक्या होत्या; ते पन्नास हात लांब व पंचवीस हात रुंद होते.