Ezekiel 40:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा आणि जवळ येऊन ऐक आणि जे काही मी तुला दाखविणार आहे त्याकडे लक्ष दे, त्यासाठीच तुला येथे आणले गेले आहे. तू जे काही बघतो ते इस्राएली लोकांना सांग.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू आपल्या डोळ्यांनी पाहा व कानांनी ऐक. आणि मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वाकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे; जे काही तू पाहतोस ते इस्राएलाच्या घराण्याला प्रगट कर.”