Ezekiel 40:48 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्या माणसाने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत 5 हात जाड आणि 3 हात रुंद होती. आणि दोन्हीमधील दार 14 हात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने मला मंदिराच्या देवडीत नेले व त्या देवडीचा प्रत्येक खांब मापला तो एका बाजूने पाच हात व दुसर्‍या बाजूने पाच हात भरला; त्या द्वाराची रुंदी एका बाजूने तीन हात व दुसर्‍या बाजूने तीन हात भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मला मंदिराच्या देवडीजवळ आणले आणि देवडीच्या खांबांचे माप घेतले; ते दोन्ही बाजूंनी पाच हात होते. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती आणि त्याच्या भिंती दोन्ही बाजूंनी तीन हात रुंद होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत पाच हात जाड आणि तीन हात रुंद होती. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती.

Recommended Reading