Ezekiel 40:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या माणसाच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात (10 फूट इंच) लांब होती. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली. मग त्या माणसाने भिंतीची उंची मोजली. ती एक पट्टी (10 फूट 6 इंच) भरली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पाहिले तर त्या मंदिराभोवती एक तट होता; त्या पुरुषाच्या हातात मापण्याची एक काठी होती; ती सहा हात लांबीची होती; हे माप एक हात व चार अंगुळे होते. त्याने त्या इमारतीच्या भिंतीची जाडी एक काठी व उंची एक काठी मापली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या क्षेत्राच्या सभोवती असलेली भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात असलेला मापन-दंड सहा हात लांब होता, ते प्रत्येक माप एक हात आणि एक वीत होते. त्याने भिंतीचे माप घेतले; ते एक काठी जाडी व एक काठी उंच होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात लांब होती. हे माप एक हात व चार अंगुले होते. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक काठी भरली. मग त्या मनुष्याने भिंतीची उंची मोजली. ती एक काठी भरली.