Ezekiel 41:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सर्वांत पवित्र जागेच्या समोर वेदी प्रमाणे दिसणारी लाकडी वस्तू होती. ती 3 हात (5 फूट 3 इंच) इंच व 2 हात (3 फूट 6 इंच) लांब होती. तिचे कोपरे, तळ व बाजू लाकडाच्या होत्या तो माणूस मला म्हणाला, “हे देवाच्या समोर असते, तेच टेबल आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या; त्याने मला म्हटले, “परमेश्वरापुढे असणारे हे मेज आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे एक लाकडी वेदी होती ती तीन हात उंच आणि दोन हात लांब होती, तिचे कोपरे, तिची बैठक आणि तिच्या बाजू लाकडाच्या होत्या. तो मनुष्य मला म्हणाला, “हा तोच मेज आहे जो याहवेहसमोर असतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र स्थानासमोर वेदी लाकडाची असून तीन हात उंच व दोन हात लांब होती. तिचे कोपरे, तिची बैठक व तिच्या भिंती लाकडाच्या होत्या. मग त्या मनुष्याने मला म्हटले, “परमेश्वराच्या पुढे असणारे हे मेज आहे.”