Ezekiel 41:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग तो माणूस शेवटच्या खोलीत गेला आणि त्याने दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. प्रत्येक बाजूची भिंत 20 हात जाड होती. आणि 7 हात रुंद होती. दार 6 हात रुंद होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आत जाऊन त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व रुंदी सात हात भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तो आतील पवित्रस्थानात गेला आणि प्रवेशद्वाराच्या खांबांचे माप घेतले; प्रत्येक खांब दोन हात रुंद होते. प्रवेशद्वार सहा हात रुंद होते आणि भिंतींची रुंदी प्रत्येक बाजूने सात हात होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो मनुष्य परम पवित्रस्थानात गेला आणि त्याने दरवाजाचा प्रत्येक खांब मापला तो दोन हात भरला; दरवाजाची उंची सहा हात व प्रत्येक बाजूच्या भिंतीची रुंदी सात हात भरली.