Ezekiel 41:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती 6 हात जाड होती. मंदिराच्या भोवताली असलेल्या बाजूच्या खोल्या 4 हात (7 फूट) रुद होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मंदिराची भिंत सहा हात मापली; मंदिरासभोवती प्रत्येक बाजूस खोल्या होत्या; त्या प्रत्येकीची रुंदी चार हात भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्याने मंदिराच्या भिंतीचे माप घेतले; ती सहा हात जाड होती आणि मंदिराच्या सभोवती असलेल्या खोल्या प्रत्येकी चार हात रुंद होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मनुष्याने मंदिराच्या भिंतीचे मोजमाप घेतले. ती सहा हात जाड होती. मंदिराच्या सभोवती प्रत्येक बाजूला खोल्या होत्या त्या प्रत्येकाची रुंदी चार हात होती.