Ezekiel 41:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बाजूच्या खोल्या वेगवेगळ्या तीन मजल्यांवर होत्या. एकावर एक अश्या त्या होत्या. प्रत्येक मजल्यावर 30 खोल्या होत्या. मंदिराच्या भिंतीना कंगोरे केलेले होते. बाजूच्या खोल्यांना ह्या कंगोऱ्यांचा आधार होता. पण मंदिराला मात्र त्या जोडलेल्या नव्हत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या; मंदिराच्या आसपास असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या, तरी मंदिराच्या भिंतीला त्या लागलेल्या नव्हत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाजूला असलेल्या खोल्या एकावर एक अशा तीन मजल्यांवर होत्या, प्रत्येक मजल्यावर तीस खोल्या होत्या. बाजूला असलेल्या खोल्यांना आधार असावा म्हणून मंदिराच्या सभोवती असलेल्या भिंतींना फळ्या होत्या, ज्या मंदिराच्या भिंतीमधून टाकल्या गेल्या नव्हत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे बाजूस असलेल्या खोल्या एकीवर एक अशा तीन मजली असून त्या रांगेने तीस होत्या. मंदिराच्या भोवताली असलेल्या खोल्यांसाठी जी भिंत होती तिला त्या लागलेल्या होत्या तरी त्या मंदिराच्या भिंतीला जोडलेल्या नव्हत्या.