Ezekiel 42:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस मला म्हणाला, “पटांगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिण दिशेकडील खोल्या ह्या पवित्र आहेत. देवाला बळी अर्पण करणाऱ्या याजकासाठी त्या आहेत. याजक तेथे अती पवित्र पदार्थ खातील. व असा पदार्थ ते तेथेच ठेवतात. का? कारण ती जागा पवित्र आहे. ते पवित्र पदार्थ म्हणजे धान्यार्पण, पापार्पण व दोषार्पण होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “सोडलेल्या जागेसमोरील उत्तरेकडल्या खोल्या व दक्षिणेकडल्या खोल्या पवित्र असून त्यांत परमेश्वरासमोर जाणारे याजक ह्यांनी परमपवित्र पदार्थांचे सेवन करावे; तेथे त्यांनी अन्नबली, पापबली, दोषबली वगैरे परमपवित्र पदार्थ ठेवावेत; कारण ते स्थान पवित्र आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो मनुष्य मला म्हणाला, “अंगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिणेकडील खोल्या या पवित्र असून त्यामध्ये परमेश्वराजवळ जाणारे याजक परमपवित्र पदार्थ खातील. तेथे ते परमपवित्र पदार्थ, अन्नार्पण, पापार्पण व दोषार्पण ठेवतील, कारण ते स्थान पवित्र आहे.