Ezekiel 42:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याजक तेथे जातील पण बाहेरच्या पटांगणात येण्याआधी त्यांना प्रथम आपली सेवेची वस्त्रे तेथेच उतरवून ठेवावी लागतील. का? कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. इतर लोक मंदिराच्या ज्या भागात जातात, तेथे याजकाला जायचे असेल तर त्याने खोलीत जाऊन दुसरी वस्त्रे घातलीच पाहिजेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजक आत गेल्यावर पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात त्यांनी तसेच जाऊ नये; तर सेवेच्या वेळची आपली वस्त्रे त्यांनी त्या खोल्यांत ठेवावीत कारण ती पवित्र आहेत; मग त्यांनी दुसरी वस्त्रे घालून सार्वजनिक स्थानी जावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा कधी याजक पवित्रस्थानात प्रवेश करतात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करतात ती पवित्रस्थानात ठेवल्याशिवाय त्यांनी बाहेरील अंगणात जाऊ नये, कारण ती पवित्र वस्त्रे आहेत. लोकांकडे जाण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी जाण्याअगोदर याजकांनी दुसरी वस्त्रे घालावी.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा याजक तेथे प्रवेश करतील, तेव्हा त्यांनी पवित्रस्थानातून बाहेरच्या अंगणात जाऊ नये तर ज्या वस्त्रांनी ते सेवा करतात ती त्यांनी बाजूला तेथेच उतरवून ठेवावी कारण ती वस्त्रे पवित्र आहेत. म्हणून त्यांनी लोकांपुढे जाण्याआधी दुसरी वस्रे घालावी.”