Ezekiel 43:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्यांना, स्वत: केलेल्या वाईट कृत्यांची लाज वाटेल. त्यांना मंदिराच्या रचनेबद्दल कळू दे. ते कसे बांधले आहे, प्रवेशद्वारे व बाहेर पडण्याची दारे कोठे आहेत, सर्व नक्षीकाम कसे आहे ह्याबद्दल त्यांना समजू दे. त्यांना मंदिराबद्दलचे सर्व विधिनियम शिकव. हे सर्व तू लिहून ठेव म्हणजे सर्वजण ते पाहू शकतील. मग ते मंदिराबाबतचे सर्व विधिनियम पाळतील. ते ह्या गोष्टी करु शकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी केलेल्या सर्व कृत्यांबद्दल ते लज्जित झाले म्हणजे त्यांना ह्या मंदिराचा आकार, त्याची रचना, त्यात जाण्यायेण्याचे मार्ग, त्यातील सर्व आकृती, त्याचे सर्व विधी व त्याचे सर्व नियम त्यांना दाखव व त्यांच्यासमोर लिहून ठेव म्हणजे त्याच्या सर्व नियमांचे व विधींचे अवलंबन करून त्याप्रमाणे ते वागतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल जर त्यांना लाज वाटली, तर त्यांना मंदिराच्या आराखड्याबद्दल; म्हणजेच त्याची रचना, बाहेर जाण्याचा व प्रवेश करण्याचा मार्ग; त्याचा संपूर्ण आराखडा आणि त्याचे सर्व विधी नियम याची माहिती दे. ते त्यांच्यासमोर लिही म्हणजे ते त्याच्या आराखड्याशी विश्वासू राहतील आणि त्याचे सर्व नियम पाळतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जे त्यांनी केले आहे त्या सर्वामुळे जर ते लज्जित होतील तर त्यांना घराचे रूप, त्याची रचना, व त्याची बाहेर निघण्याची ठिकाणे, व त्याचे प्रवेश, त्याचे सर्व आकार व त्याचे सर्व नियम व त्याचे सर्व प्रकार व त्याचे सर्व विधी दाखीव आणि हे त्याच्यासमक्ष लिही. अशासाठी की, त्यांनी त्याचा सर्व आकार व त्याचे सर्व नियम पाळावे व ते आचरावे.