Ezekiel 44:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते माझ्या पवित्रस्थानातले चाकर होतील; मंदिराच्या द्वारांपुढे ते पहारेकरी होतील व माझ्या मंदिरात ते सेवाचाकरी करतील; ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञ ह्यांचे पशू कापतील; व लोकांची सेवाचाकरी करण्यास त्यांच्यापुढे उभे राहतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मंदिराच्या द्वारांवर पहारा करीत तिथे माझ्या पवित्रस्थानात सेवा करू शकतील; लोकांसाठी होमार्पण व यज्ञाचे पशू ते कापतील आणि लोकांपुढे उभे राहून त्यांची सेवा करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.