Ezekiel 44:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण त्या लेवींनी माझ्याविरुध्द पाप करण्यात आणि त्यांच्या मूर्तींची पूजा करण्यात लोकांना मदत केली. म्हणून मी ‘त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा होईल. असे वचन देतो.”‘ परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्यांच्या मूर्तींपुढे इस्राएल घराण्याची सेवाचाकरी केली व ते त्यांना पापात पाडणारे अडथळे झाले, म्हणून मी त्यांच्यावर आपला हात उगारला आहे आणि ते आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्यांनी त्यांच्या मूर्तीसमोर लोकांची सेवा केली आणि इस्राएली लोकांना पाप करण्यास भाग पाडले, म्हणून मी उंचावलेल्या बाहूंनी शपथ घेतली आहे की त्यांनी त्यांच्या पापाचे प्रतिफळ भोगावे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्यांनी त्यांच्या मूर्तीपुढे इस्राएल घराण्याची सेवा केली व ते त्यास पापांत पाडणारे अडथळे झाले म्हणून मी आपला हात त्यांच्याविरुद्ध शपथ घेऊन उंचावला आहे आणि ते आपल्या पापासाठी किंमत देतील. असे प्रभू परमेश्वर म्हणतो.