Ezekiel 44:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून याजकाप्रमाणे, लेवी मला अर्पण करण्यास काही आणणार नाहीत. ते माझ्या ‘पवित्र’ किंवा ‘अती पवित्र’ गोष्टींच्या जवळ येणार नाहीत. त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांचा काळिमा त्यांना वाहवा लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी माझ्यासमक्ष येता कामा नये; माझ्या सर्व पवित्र वस्तू, परमपवित्र वस्तू ह्यांच्याजवळ त्यांनी येता कामा नये; तर त्यांनी आपली अप्रतिष्ठा सोसावी व आपल्या अमंगळ कर्मांबद्दल शिक्षा भोगावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी याजक म्हणून माझी सेवा करण्यास जवळ येऊ नये किंवा माझ्या कोणत्याही पवित्र वस्तूंच्या किंवा परमपवित्र अर्पणांच्या जवळ येऊ नये; त्यांनी त्यांच्या अमंगळ कृत्यांची लाज भोगावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून माझ्याकडे याजकाचे काम करायला ते माझ्याजवळ येणार नाहीत किंवा माझ्या पवित्र वस्तुजवळ, परमपवित्र वस्तू आहेत त्यांजवळ ते येणार नाहीत; त्याऐवजी त्यांनी जे घृणास्पद कृत्ये केली आहेत त्याचा दोषीपणा व निंदा त्यांना सहन करावी लागेल.