Ezekiel 44:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी आपल्या डोक्यात तागाची पागोटी घालावीत; त्यांनी कंबरेस तागाचे चोळणे घालावेत; त्यांनी घाम येण्यासारखे कंबरेस काही वेष्टू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपल्या डोक्यावर तागाचे फेटे आणि आपल्या कंबरेभोवती तागाची अंतर्वस्त्रे घालावी. त्यांना घाम येईल अशी वस्त्रे त्यांनी घालू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या डोक्यास तागाचे फेटे असावेत व त्यांच्या कमरेची अंतर्वस्त्रेही तागाची असावीत. त्यांना घाम येईल अशी वस्रे त्यांनी घालू नयेत.