Ezekiel 44:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझी सेवा करताना घातलेली वस्त्रे, बाहेरच्या पटांगणात लोकांमध्ये जाण्यापूर्वी ते उतरवून ठेवतील ते ही वस्त्रे पवित्र खोल्यांत ठेवतील. मग ते दुसरे कपडे घालतील. अशा प्रकारे ते त्या पवित्र वस्त्रांना लोकांना शिवू देणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते बाहेरील अंगणात जातील, लोकांमध्ये बाहेरील अंगणात जातील, तेव्हा त्यांच्या वस्त्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळची वस्त्रे काढून पवित्र खोल्यांत ठेवावीत व दुसरी वस्त्रे ल्यावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोक आहेत तिथे बाहेरील अंगणात जेव्हा ते जातात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करीत होते ते काढून पवित्र खोलीत ते ठेवावे आणि दुसरे कपडे घालावे, म्हणजे त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करून लोकांनी पवित्र होऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते बाहेरील अंगणात लोकांकडे बाहेर जातील, तेव्हा त्यांच्या वस्रांच्या स्पर्शाने लोक पवित्र होऊ नयेत म्हणून त्यांनी सेवेच्या वेळेची वस्रे काढून पवित्र खोल्यात ठेवावी व दुसरी वस्रे घालावी.