Ezekiel 44:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी विधवेबरोबर किंवा सोडलेल्या स्त्रीबरोबर विवाह करू नये, तर इस्राएली वंशातल्या कुमारीबरोबर अथवा कोणा याजकाची विधवा असल्यास तिच्याबरोबर विवाह करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी विधवा किंवा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी विवाह करू नये; केवळ इस्राएली गोत्रातील कुमारिकांशी किंवा याजकाच्या विधवेशी विवाह करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली वंशातील कुमारीकेशी लग्न करावे अथवा जी पूर्वी याजकाची पत्नी होती अशी विधवा, तिच्याशी लग्न करावे.