Ezekiel 44:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजक न्यायालयाचे न्यायाधीश असतील. लोकांना न्याय देताना ते माझे कायदे पाळतील. ते माझ्या विशेष सणांचे विधिनियम पाळतील, माझ्या खास सुट्ट्यांच्या दिवसांचा मान आणि पावित्र्य राखतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तंट्याबखेड्यांचा निवाडा करण्यास त्यांनी तत्पर असावे; माझ्या निर्णयांप्रमाणे हा निवाडा त्यांनी करावा; सर्व सणांत माझे विधी व नियम पाळावेत आणि माझ्या शब्बाथांचे पवित्रपणे पालन करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘कोणताही विवाद असल्यास, याजकांनी न्यायाधीश म्हणून असावे आणि माझ्या निर्णयानुसार निर्णय घ्यावा. माझ्या नेमलेल्या सर्व सणांसाठी त्यांनी माझे नियम व विधी पाळावे आणि त्यांनी माझे शब्बाथ पवित्र राखावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वादविवादाचा न्याय करण्यास त्यांनी तत्पर असावे. माझ्या निर्णयाप्रमाणे त्यांनी निवाडा करावा. ते माझ्या सर्व नेमलेल्या सणात माझे विधी व माझे नियम पाळतील, आणि माझे शब्बाथ दिवस पवित्र पाळावेत.