Ezekiel 44:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवपुत्रा, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व सर्व नियम ह्यांविषयी जे सर्व मी तुला सांगतो त्याकडे चित्त दे; डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रत्येक द्वाराने पवित्रस्थानात जाण्यासंबंधाने जे सांगतो त्याकडे चित्त दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने मला म्हटले, “मानवपुत्रा, काळजीपूर्वक पाहा, जवळून ऐक आणि याहवेहच्या मंदिराविषयी जे सर्व नियम व सूचना मी तुला सांगतो त्या सर्वांकडे लक्ष दे. मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांकडे आणि पवित्रस्थानातून बाहेर जाण्याच्या मार्गांकडे लक्ष दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला, परमेश्वराच्या मंदिराविषयीचे सर्व विधी व नियमाबाबत मी जे सर्व तुला सांगतो, त्याकडे लक्ष दे; आपले डोळे उघडून पाहा व कान देऊन ऐक आणि मंदिराच्या प्रवेशाकडे व पवित्रस्थानाच्या बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.