Ezekiel 44:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग माझे म्हणणे ऐकण्याचे नाकारणाऱ्या इस्राएलच्या सर्व लोकांना पुढील संदेश दे. त्यांना सांग. की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही केलेल्या भयंकर गोष्टी मला अति झाल्या आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या फितुरी इस्राएल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल वंशजहो, तुम्ही ही सगळी अमंगळ कृत्ये केली तेवढी पुरे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंडखोर इस्राएलास सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: अहो इस्राएली लोकांनो तुम्ही जी अमंगळ कृत्ये केली ती पुरे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तू बंडखोरांना इस्राएलाच्या घराण्यास सांग की, प्रभू परमेश्वर, असे म्हणतो, ‘इस्राएलाच्या घराण्यांनो, तुम्ही सर्व घृणास्पद कृत्ये केली आहेत, ती तुम्हास पुरेशी होवो;