Ezekiel 44:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या अमंगळ कृत्यांसह तुम्ही हृदयाने आणि शरीराने बेसुंती असे विदेशी लोक माझ्या पवित्रस्थानात आणले, अन्न, चरबी आणि रक्ताची अर्पणे करून तुम्ही माझे मंदिर भ्रष्ट केले आणि माझा करार मोडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तुम्ही माझी भाकर, चरबी व रक्त अर्पण करताना जे मनाने व शरीरानेही बेसुंती अश्या परक्या लोकांस माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यात भर टाकली आहे.