Ezekiel 45:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उत्सव, चंद्रदर्शने, शब्बाथ व इस्राएल घराण्याचे सर्व सण ह्यांत होमार्पण, अन्नार्पण व पेयार्पण ह्यांची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे; इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे म्हणून त्याने पापार्पण, अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे राजपुत्राचे कर्तव्य असावे की त्याने इस्राएलच्या सर्व नेमलेल्या सणांच्या वेळी; म्हणजेच अमावस्या आणि शब्बाथाच्या वेळी होमार्पणे, धान्यार्पणे आणि पेयार्पणे आणावी. त्याने पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे आणि शांत्यर्पणे आणून इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उत्सव, व चंद्रदर्शने, शब्बाथ आणि इस्राएलाच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अन्नार्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी त्याने अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी.