Ezekiel 45:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समर्पित अंश म्हणून ठेवलेला भाग व नगरास दिलेला भाग ह्यांना लागून दोहों बाजूंकडील म्हणजे पश्चिमेकडील व पूर्वेकडील जागा अधिपतीस द्यावी; पश्चिम सीमेपासून पूर्व सीमेपर्यंत तिची लांबी इस्राएली वंशांना वाटून दिलेल्या भागाच्या लांबीइतकी असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘पवित्र प्रदेशाच्या भोवती व शहराची मालमत्ता याला लागून प्रत्येक बाजूची सीमा राजपुत्राची असेल. तिचा विस्तार पश्चिमेपासून पश्चिमेकडे आणि पूर्वेकडून पूर्वेकडे असून त्याची लांबी पश्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत एका गोत्राच्या भागाच्या समांतर अशी असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एकाबाजूस व दुसऱ्याबाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे, आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल.