Ezekiel 45:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम ह्यांपासून दूर राहा, न्याय व नीती ह्यांचे पालन करा, आणि माझ्या लोकांना त्यांच्या वतनांतून घालवून देण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात, अहो इस्राएलाच्या राजपुत्रांनो, तुम्ही फार पुढे गेला आहात! तुमचा आतंक आणि अत्याचार टाकून द्या आणि जे नीतिपूर्ण व योग्य ते करा. माझ्या लोकांचे वतन काढून घेण्याचे थांबवा, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.