Ezekiel 46:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणखी रोज सकाळी कोकराबरोबर तुम्ही धान्यार्पण अर्पण करावे, तुम्ही त्यासाठी 1/6 एफ (14 वाडगे) पीठ व हे पीठ चांगले भिजण्यासाठी 1/3 हीन (1 गॅलन) तेल द्यावे. हे परमेश्वरासाठी रोज करावयाचे धान्यार्पण असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दररोज सकाळी त्याबरोबर अन्नार्पण सिद्ध करावे; गव्हाचे पीठ एक षष्ठांश एफा, व ते नरम करण्यासाठी एक तृतीयांश हिन तेल, असे अन्नार्पण परमेश्वराला करावे; हा सर्वकालचा विधी सतत चालणार आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.