Ezekiel 46:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवितील, धान्यार्पणे भाजतील. का? कारण मग त्यांना हा पदार्थ बाहेरच्या अंगणात नेण्याची जरुरी नाही. जेथे सामान्य लोक असतात, तेथे त्यांना ह्या पवित्र गोष्टी न्याव्या लागणार नाहीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मला म्हणाला, “याजक दोषार्पणाचे व पापार्पणाचे मांस शिजवतात ते हे स्थळ; अन्नार्पणही तेथेच भाजतात; त्यांनी ती बाहेरच्या अंगणात नेऊ नयेत, म्हणजे त्यांच्या स्पर्शाने लोक पवित्र होणार नाहीत.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो मला म्हणाला, “हे ते ठिकाण आहे जिथे याजकांनी दोषार्पण व पापार्पण शिजवावे आणि धान्यार्पण भाजावे, यामुळे बाहेरील अंगणात आणणे व लोकांना शुद्ध करण्याचे टाळता येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.”