Ezekiel 46:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सणाच्या दिवशी देशाचे लोक परमेश्वरासमीप येतील तेव्हा त्यांच्यापैकी जो नमन करण्यास उत्तरद्वाराने आत येईल त्याने दक्षिणद्वाराने बाहेर जावे व दक्षिणद्वाराने जो आत येईल त्याने उत्तरद्वाराने बाहेर जावे; ज्या द्वाराने तो येईल त्याच द्वाराने त्याने परत जाऊ नये, तर नीट पुढे जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘नेमलेल्या सणाच्या वेळी जेव्हा देशातील लोक याहवेहसमोर येतात, तेव्हा जो कोणी उपासना करण्यासाठी उत्तरेकडील द्वाराने आत येईल, त्याने दक्षिणेकडील द्वाराने बाहेर जावे; आणि जो कोणी दक्षिणेकडील द्वाराने आत येईल त्याने उत्तरेकडील द्वाराने बाहेर जावे. ज्या द्वाराने ते आत आले त्या द्वाराने कोणीही परत जाऊ नये, तर त्यांनी त्या समोरच्या द्वाराने जावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे.