Ezekiel 47:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसाने मला पुन्हा मंदिराच्या दाराशी नेले. मंदिराच्या पूर्वेकडील उंबऱ्याच्या खालून पाणी वाहताना मला दिसले (मंदिराचे तोंड पूर्वेला होते.) मंदिराच्या दक्षिणेच्या भागाखालून पाणी वेदीच्या दक्षिणबाजूने वाहात होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तेव्हा पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या मनुष्याने मला परत मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणले आणि मी मंदिराच्या उंबरठ्याखालून पूर्वेकडे पाणी बाहेर येत असताना पाहिले (कारण मंदिराचे तोंड पूर्वेकडे होते). मंदिराच्या दक्षिणेकडून, वेदीच्या दक्षिणेकडून पाणी खाली येत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या मनुष्याने मला पुन्हा मंदिराच्या प्रवेशदाराकडे नेले आणि पाहा! मंदिराच्या उंबरठ्याखालून पाणी पूर्वेकडे वाहत होते, कारण मंदिराचे तोंड पूर्वेला होते. आणि मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस पाणी वाहात होते.