Ezekiel 48:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“उत्तर-सीमा पूर्वेकडील भूमध्य समुद्रापासून पुढे हेथलोन, हामाथची खिंड ओलांडून पार पुढे दिमिष्क व हामाथ यांच्या सीमेवरील हसर-एनोनपर्यंत जाते. काही वंशांना दिलेला जमिनीचा पट्टा ह्या सीमेच्या पूर्वेकडून पश्र्चिमेकडे पसरलेला असेल. ज्यांना ही जमीन दिली जाईल ते वंश उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढीलप्रमाणे आहेत. दान, आशेर, नफताली, मनश्शे, एफ्राईम, रऊबेन, यहूदा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता वंशांची नावे ही: उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिष्काच्या सरहद्दीवरले हसर-एनान, ह्या पूर्व-पश्‍चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यादीत दिलेल्या गोत्रांची नावे ही: “उत्तरेकडील सीमेपासून दानला एक भाग असेल; तो हेथलोन मार्गापासून लेबो हमाथ, हाजार-एनानपर्यंत आणि हमाथ आणि हमाथनंतरची दिमिष्काची उत्तरेकडील सीमा पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही वंशाची नावे आहेत. दानाचा वंश देशाचा एक विभाग स्विकारील. त्याची सीमा उत्तर सीमेपासून हेथलोनाकडच्या वाटेजवळ, हामाथाच्या प्रवेशापर्यंत दिमिष्काच्या सीमेवरील हसर-एनान, उत्तरेकडे हमाथाजवळ. दानाची सीमा त्याच्या पूर्वेकडून सर्व मार्गाने महासमुद्राकडे जाईल.