Ezekiel 48:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“याजकांना मिळालेल्या जमिनीच्या भागाचा पुढचा भाग लेवींचा हिश्शाचा असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा असेल. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे 25,000 हात (8.3 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची जमीन मिळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याजकांच्या सीमेस लागून लेवी लोकांसाठी पंचवीस हजार हात लांबीचा व दहा हजार हात रुंदीचा प्रदेश द्यावा. त्याची एकूण लांबी पंचवीस हजार हात आणि रुंदी दहा हजार हात असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकांच्या सीमेपाशी लेव्यांना पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद प्रदेश मिळावा. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जमीन असावी.