Ezekiel 48:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“याजक व लेवी यांना दिलेली जमीन सोडून, 5,000 हात (1.6 मैल) रुंदीची व 25,000 हात (8.3 मैल) लांबीची जमीन शिल्लक राहील. ती नगरासाठी, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. सामान्य लोकांनी या जागेचा वापर करावा. नगर ह्या जमिनीच्या मध्यावर वसेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पाच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा; त्याच्यामध्ये नगर वसवावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“उरलेला विभाग, जो पाच हजार हात रुंदीचा आणि पंचवीस हजार हात लांबीचा आहे, तो शहराच्या सर्वसाधारण उपयोगासाठी म्हणजेच घरे आणि कुरणे यासाठी असेल. त्याच्या मधोमध शहर वसणार
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उरलेली जमीन, पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पांच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक, कुरणासाठी, घरे बांधण्यासाठी उपयोगात येईल. नगर ह्याच्या मध्यावर असावे.