Ezekiel 48:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पवित्र भागाच्या पूर्वेला व पश्र्चिमेला जी जमीन उरेल, तिची लांबी 10,000 हात (3.3 मैल) असेल. ही जमीन पवित्र भागाच्या बाजूला लागून असेल. ह्या जमिनीत नगराच्या कामगारांसाठी धान्य पिकविले जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या समर्पित प्रदेशाला लागून उरलेला जो प्रदेश त्याच्या उत्पन्नाने नगरातील कामधंदा करणार्‍यांचे पोषण व्हावे
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पवित्र भागाच्या सीमेला लागून जो उरलेला भाग जो त्याच्याच लांबीचा आहे, तो पूर्वेकडून दहा हजार हात आणि पश्चिमेकडून दहा हजार हात आहे. त्या भूमीचे उत्पन्न शहरातील काम करणार्‍यांसाठी अन्न होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर जो उरलेला प्रदेश तो लांबीने पूर्वेकडे दहा हजार हात. व पश्चिमेला दहा हजार हात होईल; आणि तो पवित्र अर्पिलेल्या प्रदेशासमोर होईल; त्याचे उत्पन्न नगरातील कामगारांसाठी अन्नासाठी होईल.