Ezekiel 48:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गादच्या जमीनीची दक्षिण सीमा तामारपासून मरीबोथ-कादेशाच्या हिरवळीच्या प्रदेशापर्यंत आणि तेथून पुढे मिसराच्या ओढ्याच्या बाजूने थेट भूमध्य समुद्रापर्यंत जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो समर्पित भाग व नगराचे वतन ह्यांच्या अलीकडे-पलीकडे उरलेला भाग अधिपतीचा असावा; वंशाना दिलेल्या भागांना लागून पंचवीस हजार हात समर्पित जागेच्या पूर्व सीमेवर, तसेच पंचवीस हजार हात जागेच्या पश्‍चिम सीमेवर असलेले भाग अधिपतीचे असावेत; समर्पित भाग व मंदिराचे पवित्रस्थान हे त्या दोहो भागांच्या मध्ये असावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पवित्र भागाच्या दोन्ही बाजूला जो उरलेला भाग आहे तो आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या हक्काची असेल. पवित्र भागाच्या पंचवीस हजार हाताच्या पूर्वेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत आणि पंचवीस हजार हाताच्या पश्चिमेपासून पश्चिमेच्या सीमेपर्यंत वाढेल. हे दोन्ही भाग जे इस्राएलच्या गोत्रांच्या भागाच्या लांबीइतकेच आहे, ते राजपुत्राच्या हक्काचे होतील आणि मंदिराच्या पवित्रस्थानासहित पवित्र भाग या सर्वांच्या मधोमध असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तो अर्पिलेला भाग व नगराचे विभाग यांच्या एका बाजूला व दुसऱ्या बाजूला जो उरलेला भाग आहे तो अधिपतीचा असावा. अर्पिलेल्या प्रदेशाच्या पंचवीस हजार हातांच्यासमोर पूर्व सीमेकडे आणि पश्चिमेकडे पंचवीस हजार हातांच्यासमोर पश्चिम सीमेकडे, वंशाच्या विभागासमोर जो प्रदेश आहे तो अधिपतीसाठी असावा आणि पवित्र अर्पिलेला प्रदेश व मंदिराचे पवित्रस्थान त्याच्या मध्यभागी असावे.