Ezekiel 48:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“नगरीभोवतीचे अंतर 18,000 हात (6 मैल) असेल. या क्षणापासून नगरीचे नाव परमेश्वर तेथे आहे” असे पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ-कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गादची दक्षिणेकडील वतनाची सीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत जाईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल.