Ezekiel 48:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ह्या जमिनीचा पुढचा भाग विशेष वापरासाठी आहे. हा भाग यहूदाला मिळालेल्या जमिनीच्या दक्षिणेला आहे. हा प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा आहे. पूर्वेकडून पश्र्चिमेकडे त्याची रुंदी इतर वंशांना मिळालेल्या जमिनीच्या रुंदी एवढीच असेल ह्या जमिनीच्या मध्यावर मंदिर असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश पंचवीस हजार हात1 रुंद व इतर वंशांच्या विभागांइतका पूर्वपश्‍चिम लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल त्यामध्ये पवित्रस्थान असणार.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यहूदीयाच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाग तू विशेष भेट म्हणून द्यावा. तो पंचवीस हजार हात रुंद, आणि त्याची लांबी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत इतर गोत्रांना दिलेल्या भागासमान असावी; त्याच्या मधोमध पवित्रस्थान असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहूदाच्या सीमेस लागून असलेला जो पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत विस्तारलेला प्रदेश पंचवीस हजार हात रुंद व इतर वंशांना मिळालेल्या विभागाइतका पूर्व बाजूपासून ते पश्चिम बाजूपर्यंत लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पाल आणि त्याच्या मध्यभागी पवित्रस्थान होईल.