Ezekiel 5:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मानवपुत्रा, तुझ्या भुकेच्या वेळे नंतर, तू ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तू एक धारदार तलवार घे. न्हाव्याच्या वस्तऱ्याप्रमाणे ती वापर आणि तुझे केस व दाढी कापून टाक. केस तराजूत घालून त्यांचे वजन कर. तुझ्या केसांचे तीन सारखे भाग कर. तुझे 1/3 केस (एक भाग) ‘नगरीवर’ (विटेवर) ठेव आणि जाळ. याचा अर्थ काही लोक नगराच्या आत मरतील. मग तलवारीने 1/3 केसांचे (आणखी एका भागाचे) बारीक बारीक तुकडे कर आणि ते नगरीभोवती (विटेभोवती) टाक. ह्याचा अर्थ काही लोक नगरामध्ये मरतील. मग राहिलेले 1/3 केस (उरलेला भाग) हवेत भिरकावून दे. वारा त्यांना दूर उडवून नेऊ देत. ह्याचा अर्थ मी तलवार उपसून दूरच्या देशांपर्यंत जाऊन काही लोकांचा पाठलाग करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे मानवपुत्रा, तू एक तीक्ष्ण तलवार घे; ती न्हाव्याच्या वस्तर्‍याप्रमाणे वापरून आपल्या डोक्यावर व दाढीवर चालव. मग तराजू घे आणि केस तोलून त्यांची वाटणी कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आता, हे मानवपुत्रा, धारदार तलवार घे व ती न्हाव्याच्या वस्तर्‍या प्रमाणे वापरून तुझे डोके व दाढीचे मुंडण कर. मग तराजूवर त्याचे माप करून केसांची वाटणी कर.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मग मानवाच्या मुला, स्वतःसाठी न्हाव्याच्या वस्तऱ्यासारखे धारधार अवजार घे व आपल्या डोक्याच्या केसांचे, दाढीचे मुंडन कर, केस तागडीत मोजून त्याचे वाटप कर