Ezekiel 5:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेममधील लोक उपासमारीने एवढे हैराण होतील की आईवडील मुलांना व मुले आईवडीलांना खातील. मी अनेक मार्गांनी तुम्हाला शिक्षा करीन. ज्यांना मी जिवंत ठेवलंय त्यांना मी सगळीकडे पसरवीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलांना खातील व मुले आपल्या बापांना खातील; मी तुझ्या ठायी न्यायशासन करीन व तुझे सगळे उरलेले लोक सर्व दिशांना विखरून टाकीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून तुझ्यामधील आईवडील आपल्या लेकरांना खातील व लेकरे त्यांच्या आईवडिलांना खातील. मी तुमच्यावर न्यायशासन आणेन आणि बाकीच्यांना वार्यावर पसरवून टाकीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तथापि बाप मुलांना, आणि मुले बापाला खाऊन टाकतील, कारण मी तुझ्यावर न्याय आणला आहे. तुमच्या उरलेल्या अंशाला चारही भागात फेकून देईल.