Ezekiel 5:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या आजूबाजूचे लोक जशी तुझी चेष्टा करतील, तसेच तुझ्यावरुन ते धडाही घेतील. मी रागावलो आणि तुला शिक्षा केली हे ते पाहतील. मी खूपच संतापलो होतो. मी तुला ताकीद दिली. मी परमेश्वर, काय करणार आहे, ते तुला सांगितले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी क्रोधाने, संतापाने व तीव्र निषेधवाणीने तुझे न्यायशासन करीन. तेव्हा तुझ्याभोवतालच्या राष्ट्रांना तू अपशब्द, निंदा, ताकीद व विस्मय ह्यांचा विषय होशील; मी परमेश्वर हे म्हणालो आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी माझा राग व क्रोधाच्या फटक्याने व निषेधाच्या आरोपाने तुला शासन करेन, तेव्हा तू तुझ्या सभोवतालच्या राष्ट्रांना निंदा व टोमणा, चेतावणी व भयाचा विषय होशील. मी याहवेह हे बोललो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यरुशलेच्या बाबतीत इतर शेजारी लोकांसाठी चेतावनीचा इशारा असेल. त्यांना निंदा करण्याचे व अपमान करण्याचे कारण मिळेल. त्यांच्यावर शासन करून त्यांचा नाश केला असे परमेश्वर देव म्हणतो.