Ezekiel 5:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुझ्यावर उपासमारीची भयंकर वेळ आणीन, मी तुझा नाश करणाऱ्या गोष्टी तुझ्याकडे पाठवीन, हे मी तुला सांगितले होतेच. ती उपासमारीची वेळ पुन्हा पुन्हा यावी. मी तुझा धान्य पुरवठा बंद करीन हे मी तुला सांगितले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमचा नाश करण्यासाठी उपासमारीचे नाशकारक तीक्ष्ण बाण सोडीन, तेव्हा तुमच्यावर मी दुष्काळाचा कहर करीन व तुमचा भाकरीचा आधार तोडीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी तुझ्यावर दुष्काळाच्या घातक व नाशवंत बाणांनी वार करेन, ते मी तुझा नाश करण्यासाठी करेन. मी तुझ्यावर अधिक आणि अधिक दुष्काळ आणेन व तुझा अन्नपुरवठा संपुष्टात आणेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्यात कडूपणाचे बाण पाठवेन, त्याचा अर्थ असा होईल मी तुमचा विध्वंस होईल, त्यांच्या वरचा दुष्काळ अजून कठोर करून तुमच्या भाकरीचा आधार काढून टाकेन;