Ezekiel 5:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी तुझ्यावर उपासमार आणि हिंस्त्र प्राणी पाठवीन आणि ते तुझ्या मुलांना मारतील हे मी तुला सांगितले होते. नगरात सगळीकडे रोगराई व मृत्यू थैमान घालेल आणि शत्रू सैनिकांना तुझ्याविरुद्व लढण्यासाठी आणीन, असे मी तुला बजावले होते. ह्या सर्व गोष्टी घडतील असे मी म्हणजेच परमेश्वराने तुला सांगितले होते आणि तसेच घडेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुमच्यावर दुष्काळ व हिंस्र पशू पाठवीन; ते तुम्हांला नि:संतान करतील; मरी व रक्तपात तुमच्यावर येतील; मी तुमच्यावर तलवार आणीन; मी परमेश्वर हे म्हणालो आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुझ्याविरुद्ध दुष्काळ आणि जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुला अपत्यहीन करतील. मरी व रक्तपात तुमच्यात असतील, आणि तुझ्याविरुद्ध मी तलवार आणेन. मी याहवेह हे बोललो आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुष्काळ, रोगराई तुमच्यावर पाठवीन, तुम्ही आपत्यहीन व्हाल, साथीचा रोग, रक्तस्राव आणि तुम्हावर तलवार चालवीन. असे परमेश्वर देव म्हणतो.”