Ezekiel 5:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यरुशलेमच्या लोकांनी माझ्या नियमांविरुद्ध बंड केले. दुसऱ्या कोठल्याही राष्ट्रांपेक्षा ते वाईट आहेत. त्यांच्या भोवती असलेल्या देशांतील लोकांपेक्षा त्यांनी माझे नियम जास्त मोडले. त्यांनी माझ्या आज्ञा मानायचे नाकारले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी तिने दुष्ट आचरण करून माझ्या निर्णयांना इतर राष्ट्रांपेक्षाही अधिक विरोध केला, तिने सभोवतालच्या प्रदेशांपेक्षाही माझ्या नियमांचा अधिक विरोध केला; कारण त्यांनी माझ्या निर्णयांचा अव्हेर केला व माझ्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही आपल्या दुष्टतेने तिने माझे नियम व विधींचा तिच्याभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक विरोध केला आहे. तिने माझे नियम नाकारले व माझ्या विधींचे पालन केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तिने वाईट आचरण करून इतर देशांहून माझा धिक्कार केला आहे, आणि त्यांनी माझ्या न्यायीपणाचा व आज्ञाचा विरोध केला आहे.