Ezekiel 5:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकट आणीन. का? कारण तुम्ही माझे नियम पाळले नाहीत, माझ्या आज्ञा मानल्या नाहीत. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हीच माझे नियम अधिक मोडलेत. एवढेच नाही तर ते लोक ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणत होते, त्याच तुम्ही केल्यात.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या अर्थी तुम्ही आपल्या सभोवतालच्या राष्ट्रांपेक्षा अधिक बंडाळी माजवली व माझ्या नियमांप्रमाणे चालला नाहीत, माझे निर्णय पाळले नाहीत, आणि आसपास राष्ट्रे आहेत त्यांच्या निर्णयाप्रमाणेदेखील वागला नाहीत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“यामुळे सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तुम्ही आपल्या सभोवती असलेल्या राष्ट्रांपेक्षा अधिक मोकाट झाला आहात आणि तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळले नाही. तुमच्या सभोवती असलेल्या राष्ट्रांप्रमाणे देखील तुम्ही वागला नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून परमेश्वर देव असे सांगतो; तुम्ही आजूबाजुच्या देशांपेक्षा अधिक त्रासदायक आहात. तुम्ही सभोवतालच्या देशाहून अधिक माझ्या फर्मानाचे पालन केले नाही.