Ezekiel 5:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “म्हणून आता मी सुद्धा तुमच्या विरुद्ध आहे. ते इतर लोक पाहात असतानाच मी तुला शिक्षा करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या अर्थी प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी, मीच तुझ्या विरुद्ध होईन आणि राष्ट्रांदेखत तुझ्यामध्ये न्यायशासन करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे यरुशलेमे, मी स्वतःच तुझ्याविरुद्ध आहे आणि मी सर्व राष्ट्रांसमक्ष तुला शासन करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणूनच परमेश्वर देव म्हणतो; पहा! मीच तुमच्या विरोधात काम करेन! तुम्हास केलेले शासन हे आजूबाजुच्या देशाच्या डोळ्यादेखत तुम्हावर होईल.