Ezekiel 6:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “टाळ्या वाजवून आणि तुझे हातपाय आपटून इस्राएलच्या लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध बोल. ते रोगराईने व उपासमारीने मरतील अशी त्यांना ताकीद दे. ते युद्धात कामी येतील, असे त्यांना सांग.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभू परमेश्वर म्हणतो, “आपले हातपाय आपटून म्हण: इस्राएल घराण्याच्या सर्व अमंगळ दुष्कर्मांचा धिक्कार असो; ते तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांच्या सर्व दुष्ट व अमंगळ कृत्यांसाठी तुमचे हात एकमेकांवर मारा आणि “अरेरे!” असे म्हणत तुमचे पाय आपटून रडा, कारण ते तलवार, दुष्काळ व पीडा यांनी पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देव हे म्हणतो; “टाळ्या वाजव आपले पाय आपट, अहा! कारण इस्राएलाच्या घराण्यात सर्व प्रकारचे वाईट घृणा आहेत. त्यांच्यावर तलवार, दुष्काळ, साथीचा रोग येईल.