Ezekiel 6:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तेव्हाच तुम्हाला मीच परमेश्वर आहे हे कळेल, जेव्हा तुमची प्रेते, तुमच्या घाणेरड्या मूर्ती आणि तुमच्या वेदी यांच्यापुढे पडतील, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजून येईल. उंच टेकड्या, पर्वत, हिरवी झाडे, दाट पालवीची एलाची झाडे अशा ठिकाणी म्हणजेच तुमच्या पूजेच्या प्रत्येक ठिकाणी प्रेते पडतील. ह्या सर्व ठिकाणी तुम्ही बळी अर्पण केले आणि घाणेरड्या मूर्तींपुढे सुवासिक धूप जाळला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पण केला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे, जेव्हा त्यांचे मस्तक त्यांच्या वेद्यांपुढे उच्च ठिकाणी ओक झाडा शेजारी, हिरव्या छाये खाली पडलेले असतील, जेथे ते मुर्त्यांना सुगंधी द्रव्य अर्पण करीत होते!