Ezekiel 6:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या पर्वंतांना पुढील गोष्टी सांग. ‘इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराकडून, माझ्या प्रभूकडून आलेला संदेश ऐका. देव, माझ्या प्रभू, टेकड्या, पर्वत, घळी, दऱ्या या सर्वांना उद्देशून म्हणतो की पाहा! मी (म्हणजेच देव) तुमच्याविरुद्व लढण्यासाठी शत्रूला आणीत आहे. मी तुमच्या उच्चस्थानांचा नाश करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे म्हण: इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर पर्वत, टेकड्या, नाले व खोरी ह्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच तुमच्यावर तलवार आणून तुमची उच्च स्थाने उद्ध्वस्त करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सांग: ‘अहो इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्ही सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह पर्वतांना व डोंगरांना, झर्यांना व दर्यांना असे म्हणतात: मी तुमच्याविरुद्ध तलवार आणेन, आणि मी तुमची उंचावरील पूजास्थाने नष्ट करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर देवाचा शब्द ऐका! असे इस्राएलाच्या पर्वताला जाऊन सांग, देव त्या पर्वत, दऱ्याखोऱ्यांना, झऱ्यांना सांगत आहे; ऐका! मी तुमच्या विरुध्द तलवार चालवीन, आणि मी तुमचे उच्चस्थान उध्वस्त करील.