Ezekiel 7:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“रोप उगवते व वाढते आणि त्याला फुले येतात, त्याप्रमाणे शिक्षेची ती वेळ आली आहे. देवाने खूण केली आहे. शत्रू तयार झाला आहे. शिक्षेला सुरवात होत आहे. हातातील काठीला अंकुर फुटले आहेत. गर्विष्ठ राजा (नबुखद्नेस्सर) अधिक तयार झाला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! तुझा शिक्षारूप रोपा उगवला आहे, तो फोफावून त्याचा दंड बनला आहे, तो गर्वाने फुलला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘पाहा, तो दिवस! पाहा, तो येत आहे! विनाशाचा भडका उठला आहे, काठीला अंकुर फुटला आहे, अहंकार फुलला आहे!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहा! असे दिवस येत आहेत, जे घमंडाने भरलेल्या शिक्षेची काठी तुम्हावर येईल.