Ezekiel 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ती शिक्षेची वेळ आली आहे. तो दिवस जवळच आहे. विकत घेणाऱ्यांना आनंद होणार नाही, विकणाऱ्यांना खेद वाटणार नाही. का? कारण प्रत्येकालाच ती भयंकर शिक्षा भोगावी लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समय आला आहे, दिवस समीप आला आहे; विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पावो; कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
समय आला आहे! दिवस येऊन ठेपला आहे! विकत घेणार्याने आनंद करू नये किंवा विकत देणार्याने दुःखी होऊ नये, कारण माझा क्रोध संपूर्ण समुहावर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेळ, दिवस समीप येत आहे, हर्ष खरेदी न करो आणि दुःख विक्री न करो, तोपर्यंत माझा क्रोध सर्व बहुसंख्य लोकांवर रहाणार आहे.